Vadgaon Maval News : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, मावळ तालुका भाजप ची मागणी

एमपीसी न्यूज  – शंभर कोटीची खंडणी मागणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी मावळ तालुका भाजपने रविवार (दि 21) येथे पोटोबा महाराज मंदिर ते पंचायत समिती चौकापर्यंत आघाडी सरकारविरोधात निषेध मोर्चा काढून केली. 

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली येथील पोटोबा महाराज मंदिरापासून हा मोर्चा काढण्यात आला. पंचायत समिती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भेगडे यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, तालुका सभापती निकिता घोटकुले, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम,जिजाबाई पोटफोडे,सुवर्णा कुंभार,ज्योती शिंदे,जि. प.सदस्य नितीन मराठे,अलका धानिवले,सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे, गटनेते दिनेश ढोरे, प्रसाद पिंगळे, सुधाकर ढोरे, संभाजी म्हाळसकर, नितीन कुडे, रमेश ढोरे, रवींद्र म्हाळसकर,  धनगर आघाडी अध्यक्ष नामदेव शेडगे आदी कार्यकर्ते तसेच मान्यवर आंदोलनामध्ये सहभागी होते.

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण झालेले दिसते. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाआघाडी सरकारचे पाय चिखलात फसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांची या पदावरून हकालपट्टी करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.