Pimpri : इतर राज्यांच्या गृहमंत्र्यांना अभ्यास दौ-यासाठी महाराष्ट्रात यावे लागेल एवढा कडक दिशा कायदा करा – राज्यमंत्री अदिती तटकरे

एमपीसी न्यूज – आरक्षण नसेल तेव्हा पण महिलांना सन्मान आणि समान वागणूक मिळेल तेव्हा ख-या अर्थाने समाज बदलतोय असे म्हणता येईल. महिलांवर होणारे आत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. पण यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे मत राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज (रविवारी) आकुर्डी येथील आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमहापौर योगेश बहल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नुकताच सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महाविकास आघाडी महिला सुरक्षेला प्राधान्य देत आहे. सायबर सेल, दक्षता कमिटी, भरोसा सेल या सारख्या कार्यक्रमांना बळकटी देण्याचे काम सरकार करत असल्याचा दावा अदिती तटकरे यांनी केला. नुसत्या योजना व कायदे करून परिस्थिती बदलता येणार नाही तर त्यासाठी पुरूषी मानसिकता पण बदलणे आवश्यक आहे. मजबूत कायदा गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी गरजेचे असतात आणि सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आजवर महिला का नाही विराजमान झाली या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाल्या फक्त महिलाच महिलांचा विकास करू शकते हा विचार चुकीचा आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला असामान्य कामगिरी करून दाखवत आहेत लवकरच मुख्यमंत्री पदावर सुद्धा एखादी महिला दिसेल अशी आशा करायला हरकत नाही असे अदिती तटकरे म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.