Pune : बाधितांना मिळणार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे

एमपीसी न्यूज –  कालवा फुटल्याने पूर्णतः बाधित झालेल्या कुटुंबांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे देणार असून, योजनेत न बसणा-या कुटुंबांना भाड्याने घरे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. कालवा फुटीच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व विभागांची बैठक पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 

महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त सौरभ राव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, नगरसेवक धीरज घाटे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके या वेळी उपस्थित होते. या परिसरातच आणखी चार पाच ठिकाणी भगदाड पडले असून, त्याची दुरुस्ती सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.