Pimple Saudagar : नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी निवृत्ती लक्ष्मण साखरे याने इयत्ता दहावीमध्ये ९३.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शीतल नाना काटे यांच्या हस्ते  सत्कार केला. 

महानगरपालिकेच्या एक लाखाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. निवृत्तीचे वडील लक्ष्मण साखरे हे खासगी सुरक्षारक्षकाचे काम करतात. आई आणि वडील हे दोघेही अशिक्षित असताना सुद्धा निवृत्तीने मिळविलेल्या यशाचे विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शीतल नाना काटे यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.