Akurdi : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम आकुर्डी येथे झाला.

कार्यक्रमासाठी महापौर राहूल जाधव, जहागीरदार अमरजीत राजे बारगळ, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सर्यकांत गोफणे, घन:शाम हाके, दीपक भोजणे आदी उपस्थित होते. प्रवीण काकडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ‘धुमस’ चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलतडे, डॉ. गोवर्धन, अभिनेता रोहन पाटील, कार्तिक पाटील यांचा सन्मान महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी येथे अहिल्याबाई होळकर यांचा मोठा पुतळा बसवण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसार अहिल्याबाई होळकर यांचा मोठा पुतळा मोरवाडी येथे बसवण्यात येणार आहे.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपले ध्येय निश्चित करावे. समाजकारणावर भर द्यावा. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. त्या भावनेतून समाजकारण करावे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक महावीर काळे यांनी केले. सूत्रसंचालन यशोदा नाईकवाडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.