Dighi : विविध क्षेत्रातील 500 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रात कर्तृत्त्व गाजवणाऱ्या दिघीतील 500 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आदर्श माता, शिक्षिका, वकील, डॉक्टर, स्वच्छता दूत, मोलकरीन महिलांचा भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दिघीतील परांडेनगर येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमाला आयोजक नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत दिघी परिसरातील विविध क्षेत्रात कर्तृत्त्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

_MPC_DIR_MPU_II

आमदार महेश लांडगे म्हणाले, जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण राजमाता जिजाऊंना स्मरून आश्वासन देतो. आपल्याला कोणत्याही प्रसंगाला, समस्येला सामोरे जात असताना एक भाऊ म्हणून आम्हाला आवाज द्या. आम्ही आपल्यासाठी तत्परतेने उभे राहू, ही खात्री मी सर्व महिलांना देतो. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मतदारसंघातील महिलांना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आज सर्वच क्षेत्रात महिलांचे पाऊल पुढे पडत आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. हे जग सुंदर बनविण्यात स्त्रियांचा वाटा मोलाचा राहिलेला आहे.  प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.