Vadgaon Maval : कॊरोना काळात कर्तव्य तत्पर असणाऱ्या शिक्षकांचा सन्मान

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे (मावळ) च्या वतीने प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ” विचार साहेबांच्या महिला धोरणाचा ” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून ” ज्ञानदायिनी ” सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॊरोना काळातही कर्तव्यतत्पर असणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.  

याप्रसंगी  प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा संतोष खांडगे उपस्थित होत्या. नगरसेविका मंगल भेगडे, राष्ट्रवादी युवती मावळ तालुका अध्यक्षा निशा पवार, राष्ट्रवादी मावळ तालुका महिला उपाध्यक्षा  शैलजा काळोखे, तळेगाव दाभाडे शहर महिला कार्याध्यक्षा रुपाली विनोद दाभाडे, शहर युवती अध्यक्षा शिवानी सोनवणे, महिला शहर उपाध्यक्षा ज्योति शिंदे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानी झाली, स्वागत केले,प्रास्ताविक मुख्याध्यापक भगवान शिंदे यांनी केले. महिला धोरणा संबंधीत माहिती वैशाली दाभाडे यांनी दिली,अध्यक्षीय भाषण रजनीगंधा खांडगे यांनी केले, सन्मानाला उत्तर शारदा वाघमारे, मुख्यद्यापीका अनिता तानाजी लादे व भेगडे यांनी दिले. सूत्रसंचालन वैशाली कोयते यांनी केले तसेच आभार निशा पवार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.