Chinchwad News : चिंचवडमध्ये कोरोना योद्धांच्या सन्मान 

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची काळजी न करता कोरोना रूग्णांची सेवा केली त्या कोरोना योद्धांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्विकृत नगरसेवक विठ्ठल बबनराव भोईर व आमदार लक्ष्मण  जगताप विचार मंचाच्या वतीने डॉक्टर, पोलीस अधिकारी व सफाई कर्मचारी यांना कोरोना योध्यांचा मानपत्र, दिवाळी मिठाई व मास्क देऊन सन्मान करण्यात आला. 

_MPC_DIR_MPU_II
तालेरा रूग्णालयातील डॉक्टर, चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे पोलीस अधिकारी आणि चिंचवड ब प्रभागात कार्यरत असणारे सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्याता आला. तसेच त्यांना सन्मानपत्र आणि मिठाई वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागेश सदावर्ते, करण खरे,  निखिल थोरवे, दत्ता पोपलगत, पप्पू विश्वकर्मा आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.