Pune News : फुरसुंगीत भीषण अपघात, ट्रकने दुचाकीवरील दांपत्याला दिली धडक

 पत्नीचा जागीच मृत्यू तर तिघे जण जखमी

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील हडपसर परिसरात आज पहाटेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका दांपत्याला ट्रकने धडक  दिल्याने झालेल्या या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाले आहेत. या अपघातात पत्नी ट्रकच्या दोन टायरच्या खाली सापडल्याने चिरडली गेली आहे. 

लक्ष्मी प्रमोद मालुसरे (वय 32) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.  तर प्रमोद मालुसरे (वय 38) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की मालुसरे दांपत्य आहे फुरसुंगी येथून भोर या गावी निघाले होते. प्रमोद मालुसरे हे दुचाकी चालवत होते तर पत्नी आणि दोन मुले पाठीमागे बसली होती. दरम्यान आज सकाळच्या सुमारास मंचर वाडी पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरून खाली पडलेल्या लक्ष्मी मालुसरे ट्रकच्या चाकाखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात प्रमोद मालुसरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची दोन लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.