Kivle Accident News : खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात

बसमधील क्लीनरचा मृत्यू, 9 जखमी

एमपीसी न्यूज – उदगीर ते मुंबई जाणारी खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसमधील क्लीनरचा मृत्यू झाला असून 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवारी, दि. 11) पहाटे कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर रावेत आणि किवळे या दोन गावांच्या मध्ये एका पेट्रोल पंपाजवळ मुंबई मार्गावर झाला.

बजरंग गायकवाड (वय अंदाजे 35) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 9 जखमी प्रवाशांपैकी 6 जणांना औंध रुग्णालयात तर 3 प्रवाशांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वनिता ट्रॅव्हल्स कंपनीची एक बस उदगीर येथून मुंबईला जात होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर रावेत आणि किवळे या दोन गावांच्या मध्ये एका पेट्रोल पंपाजवळ बस आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर 4 वाजून 46 मिनिटांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. ल

मुख्य अग्निशमन विभागाचा एक आणि राहटणी उपविभागाचा एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सिनिअर फायरमन विलास कडू, वाहन चालक मंगेश देवकरकर, फायरमन दिनेश इंगळकर, सुशीलकुमार राणे, लक्ष्मण ओव्हाळे, श्रीकांत वैरागर आदी जवान घटनास्थळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.