Pune News : ‘हॉरर’ चित्रपटांमुळे नकारात्मकता वाढते, संशोधनातून निष्कर्ष

एमपीसी न्यूज – आपण मनोरंजनासाठी चित्रपट पहातो. अनेकांना भयपट (हॉरर) चित्रपट पहायला आवडतात. पण, भयपटांमुळे व्यक्तीच्या नकारात्मकतेमध्ये प्रचंड वाढ होते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे शॉन क्लार्क यांनी केले आहे. श्रीलंका येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’ने श्रीलंकेत आयोजित केलेल्या 8 व्या ‘सामाजिक विज्ञान परिषदे’त ते बोलत होते. 

शॉन क्लार्क यांनी ‘भयपट चित्रपट (हॉरर मूव्ही) सूक्ष्म परिणाम’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेत, तर शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

प्रयोगशाळेतील स्टुडिओमध्ये 17 व्यक्तींना भयपट चित्रपट दाखवला. एका गटाने तो चित्रपट दुपारी पाहिला आणि दुसर्‍या गटाने रात्री पाहिला. यूएएस उपकरण व्यक्तीची सकारात्मकता आणि नकारात्मकता दर्शवते; म्हणून चित्रपट पहाण्यापूर्वी आणि पाहिल्यानंतरही प्रभावळीची नोंद घेण्यात आल्या. बायोवेल उपकरण मानवाच्या चक्रांमधील शक्तीची स्थिती/क्षमता दर्शवत असल्याने त्या उपकरणाद्वारेही चाचणी करण्यात आली.

‘यूएएस’द्वारा केलेला ‘भयपट चित्रपटा’चा प्रभावळीवर (ऑरावर) होणारा परिणाम : नकारात्मकतेत सरासरी 107 टक्के वाढ झाली होती, म्हणजे वाढ दुप्पट झाली. काहींच्या बाबतीत ती वाढ 375 टक्के इतकी होती. प्रयोगापूर्वी ज्या व्यक्तींची प्रभावळ (ऑरा) सकारात्मक होती.

त्यात 60 टक्के घट आढळली, तर काहींची सकारात्मक प्रभावळ समूळ नष्ट झालेली आढळली. दुसर्‍या दिवशी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसारही त्यांची प्रभावळ (ऑरा) पूर्ववत झाली नव्हती. खरेतर तो चित्रपट पहाण्यापूर्वी असलेल्या त्यांच्या प्रभावळीतील नकारात्मकतेत सरासरी 55 टक्के वाढच दिसली. ज्या व्यक्तींनी रात्री तो चित्रपट पाहिला होता, त्यांच्या नकारात्मकतेत, ज्यांनी चित्रपट दुपारी पाहिला होता त्यांच्या 31 टक्केच्या तुलनेत 112 टक्क्यांनी वाढ झालेली दिसली असे क्लार्क म्हणाले.

चित्रपट पहाण्यापूर्वी एका व्यक्तीच्या केलेल्या चाचणीत तिची सर्व चक्रे सर्वसाधारण रेेेषेत होती. त्यांचा आकारही खूप मोठा होता, याचा अर्थ ती व्यक्ती स्थिर आणि ऊर्जावान होती. चित्रपट पाहिल्यानंतर मात्र तिची चक्रे अव्यवस्थित दिसली, त्यांचा आकारही लहान झाला होता, म्हणजे ती व्यक्ती अस्थिर आणि तिची सर्वसाधारण क्षमता कमी झालेली दिसली असे, निष्कर्षात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.