Pune Kondhva News : रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्राईम हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला आणले होते. डॉक्टरांनी या रुग्णाची तपासणी करत तो मयत असल्याचे त्याच्या नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर सिद्धांत यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर आरोपीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आणि सिक्युरिटी केबिनवर दगडफेक करत तोडफोड केली.

दरम्यान रात्री उशिरा कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. डॉक्टर तोतला यांनी केलेल्या तक्रारीनंतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.