Dehuroad : जेवण न दिल्याने हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेलमध्ये जबरदस्तीने जाऊन हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यामध्ये व्यावसायिक जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री साडेअकरा वाजता हॉटेल सेंच्युरी गार्डन येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय तिमप्पा पुजारी (वय 41, रा. निगडी गावठाण) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रौ साडेअकरा वाजता फिर्यादी पुजारी त्यांचे हॉटेलचे पुढील गेट बंद करून हॉटेलमध्ये कामगारांसोबत आवराआवर करत होते. त्यावेळी चार अनोळखी आरोपी हॉटेलच्या मागील दाराने आले. त्यांनी पुजारी यांना जेवण मागितले. त्यावर पुजारी यांनी ‘हॉटेल बंद झाले आहे. जेवण मिळणार नाही’ असे सांगितले. यावरून चौघांनी पुजारी व त्यांच्या हॉटेलमध्ये कामगारांना शिवीगाळ केली. एकाने रोडवर पडलेला सिमेंटचा ब्लॉक पुजारी यांच्या डोक्यात मारला. तसेच कामगार प्रबास बिश्वास याला देखील मारहाण केली. अन्य आरोपींनी हॉटेलवर दगड मारून एम एच 04 / डी एन 5883 या कारमधून मुंबईच्या दिशेने पळून गेले. उपचारानंतर पुजारी यांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like