Wakad : प्रथमदर्शनीच खाद्यपदार्थांच्या प्रेमात पाडणारे ‘फ्लेचाझो’

एमपीसी न्यूज- सध्याच्या मॉडर्न जगात खाद्यपदार्थांचे वेगवेगळे पर्याय आपल्याला नेहमी उपलब्ध होत असतात. पूर्वीचा काळ वेगळा होता. तेव्हा फक्त घरगुती खाद्यपदार्थांचीच चलती होती. पण जसजसं जग जवळ येत गेलं तसतसे जगभरातील विविध देशांमधील खाद्यपदार्थ चाखण्याची संधी आपल्याला मिळू लागली. भारतीय आणि परदेशी कुझिनमध्ये देखील वेगवेगळे पर्याय मिळू लागले. चोखंदळ खवय्यांना खास भूमध्य सागरी म्हणजे मेडिटेरेनियन खाद्यपदार्थांची चव चाखायची असेल तर आता आपल्यासाठी एका स्पेशल हॉटेल नुकतेच सुरु झाले आहे. वाकड येथील सिल्व्हर स्पोर्टस् क्लबशेजारी फ्लेचाझो या नावाचे खास मेडिटेरेनियन आणि आशियायी चवीचे खाद्यपदार्थ मिळणारे रेस्टॉरंट सुरु झाले असून तेथे ठराविक दरात अमर्यादित स्वरुपात विविध शाकाहारी आणि मांसाहारी डिश उपलब्ध आहेत.

लव्ह इन मेडिटेरअशिया ही इथली थीम असून वेगवेगळ्या चवीच्या सर्वसमावेशक डिशेस येथे उपलब्ध आहेत. येथे आल्यानंतर सर्वप्रथम आपल्यासमोर येतात ते फूडशॉट या वेगळ्याच प्रकारातील पदार्थ. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर साधारणपणे पहिल्यांदा आपण ऑर्डर देतो ती स्टार्टर्सची. पण इथे स्टार्टर्स येण्याआधी आपण या प्रकारातील पदार्थ चाखू शकतो. एका छोट्याशा कन्व्हेअर बेल्टवरून गोल गरगरीत पाणीपुरीच्या पु-या, छोट्या बाटलीतील चविष्ट पाणी, ब्रेडवर लावलेले टॉपिंग, जपानची स्पेशालिटी डिश म्हणजे सुशी आपल्यासमोर फिरत असतात. आपण त्यातील सर्व पदार्थांची चव घेऊ शकतो. त्याचवेळी एका अफलातून चवीचे वेलकम ड्रिंक आपल्या टेबलावर येते. मिक्स फ्रूट ज्यूसची एक वेगळीच चव आपल्या जिभेवर रेंगाळू लागते. या पाठोपाठ आपल्यासमोर येतात ते विविध प्रकारचे स्टार्टर्स. मांसाहारीप्रेमींसाठी खमंग, खरपूस भाजलेले चिकन, प्रॉन्स, मटन खिमा आणि शाकाहारी लोकांसाठी भरलेले बटाटे, सोया खिमा, कुरकुरीत मक्याचे दाणे, केळ्याचे कबाब.

यानंतर आपल्याला आस्वाद घ्यायचा असतो तो पिझ्झा आणि पास्ताचा. येथे आपण आपल्याला हवा तो पिझ्झा आपण स्वत:देखील तयार करुन घेऊ शकतो. आणि नाहीतर हवे ते टॉपिंग असलेला पिझ्झा किंवा हव्या त्या सॉसमधला पास्ता ऑर्डर करु शकता. व्हेजमध्ये देसी, विदेसी, फ्रूट चाट डिलाइट आणि नॉन व्हेजमध्ये चिकन, केप कामोरिन असे पिझ्झा येथे आपल्याला मिळू शकतात.

नंतर आपण मोर्चा वळवायचा ते मेन कोर्सच्या काऊंटरकडे. यासाठी व्हेजमध्ये सुमारे सात ते आठ डिश आणि नॉनव्हेजमध्ये दहा ते बारा विविध चवीच्या डिश सुंदरपणे सजवलेल्या आपली वाट बघत असतात. खरं तर स्टार्टर्स आणि पिझ्झा, पास्ताने पोट भरलेले असते. पण येथील प्रत्येक डिश इतकी आकर्षकपणे सजवून काऊंटरवर मांडलेली असते की प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतली तरी मन आणि पोट दोन्ही तृप्त होते. आणि यानंतर ख-या खवय्यांच्या आवडीचा डेझर्टचा काऊंटर आपली वाट बघतच असतो. गुलाबजाम, रबडी, जिलेबी, मूगडाळ हलवा तसेच विविध फ्लेवरची आईस्क्रीम हे देशी गोड पदार्थ आणि केक, पेस्ट्री, ब्राऊनी, मॅक्रून्स, तिरामित्सू अशी परदेशी डेझर्टस् येथे आहेत.

स्पॅनिश भाषेत फ्लेचाझोचा अर्थ आहे, लव्ह अॅट फर्स्ट साइट म्हणजेच प्रथमदर्शनी प्रेम. येथे आल्यानंतर आपली देखील अशीच अवस्था नक्कीच होते. येथील खाद्यपदार्थांच्या आपण प्रेमातच पडतो. आणि परत परत येण्याचे मनाशी ठरवूनच या रेस्टॉरंटचा निरोप घेतो.

फ्लेचाझो,
165, दुसरा मजला, वॅन्टाजिओ, सिल्व्हर स्पोर्टस् क्लबशेजारी,
वाकड, पुणे.
फोन नंबर –  80953,11112 

   

   

   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.