रविवार, जानेवारी 29, 2023

Hotel Kshatriya : हॉटेल क्षत्रिय आपल्यासाठी घेऊन आले आहेत, बजेट फ्रेंडली शुद्ध शाकाहारी अन् मस्त मांसाहारी!

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडमधील चोखंदळ खवय्यांसाठी खास हॉटेल क्षत्रिय घेऊन आले आहे, शुद्ध शाकाहारी – मस्त मांसाहारी खाद्यसंस्कृती (Hotel Kshatriya) आणि तेही तुमच्या खिशाला परवडेल अशा दरामध्ये….! अर्थात हॉटेल क्षत्रियची ओळख वेगळी सांगायला नको. कारण अवघ्या वर्षभरात हॉटेल क्षत्रिय खवय्यांच्या पसंतीस चांगलेच उतरले आहे. येथे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही जेवणाची अगदी मनसोक्त रेलचेल आहे.

शाकाहारी खवय्यांसाठी खास महाराष्ट्रीयन, पंजाबी, मोगलाई व चायनीज अशा विविध डिशेस उपलब्ध आहेत; तर मांसाहारी खवय्यांसाठी कोल्हापुरी मटण थाळी, चिकन थाळी, फिश थाळी, कबाब आणि त्याचबरोबर ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले ‘चिकन रान’सुद्धा त्याच्या जोडीला क्षत्रियमध्ये बनविलेली खास कोकणी स्टाइल सोलकढी ही तर ‘क्षत्रिय’ची स्पेशालिटी!

खास ग्राहकांच्या सुचनांचा विचार करून हॉटेल क्षत्रिय घेऊन आले आहेत; 4 लोकांसाठी जम्बो थाळी, क्षत्रियची खास चटकदार क्षत्रिय स्पेशल दम बिर्याणी; असे नवनवीन तिखट, तर्रीदार, झणझणीत व चवदार मेन्यूची क्षत्रियमध्ये चांगलीच चंगळ आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पूर्णानगर येथील क्षत्रिय चौकात असणारे हे हॉटेल सर्वांना अगदी सहज पोहचता येण्यासारखे आहे. प्रशस्त व वातानुकुलित बैठक व्यवस्था, स्वच्छता, आदब व विनयशील सेवा ही हॉटेल क्षत्रियची खास वैशिष्ट्ये आहेत. अगदी खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये चोखंदळ ग्राहकांसाठी जिभेवर रेंगाळणारी चव देण्याचा क्षत्रियचा प्रामाणिक प्रयत्न असतो.

Chinchwad Bye Election : मागीलवेळी राहुल कलाटे यांनी लाखाच्यावर मते घेतली, यावेळी आम्ही जिंकू – संजय राऊत

या बरोबरच क्षत्रियमध्ये ‘टेक अवे पार्सल’ सुविधेवर 5% डिस्काउंट तसेच कमीत कमी 400 रुपयांच्या पार्सल ऑर्डरवर  घरपोच सुविधा एकदम मोफत. त्यामुळे घरबसल्या अगदी ऐनवेळी देखील तुम्ही गरमागरम जेवण मागवू शकता. मागील वर्षभरात ग्राहकांनी क्षत्रियला अगदी डोक्यावर घेतले आहे.

क्षत्रिय 5 किलोमीटरपर्यंत घरपोच (Hotel Kshatriya) पार्सल सुविधासुद्धा देते. क्षत्रिय केवळ जिभेवर रेंगाळणारी चवच देत नाही; तर त्या अवीट चवीचे गोड नात्यात रुपांतर करून ते जपण्याचेही काम करते. रूचकर चव, आदरातिथ्य व विनम्र सेवा, आपुलकी व जिव्हाळा या वैशिष्ट्यांबरोबरच हॉटेल ‘क्षत्रिय’ खाद्यसंस्कृतीमधील एक मैलाचा दगड ठरले आहे.  

अगदी 220 रुपयांपासूनच्या चिकन थाळी, तर 270 रुपयांपासूनच्या मटण थाळी उपलब्ध आहे. जिला ग्राहकांची खास पसंती मिळाली आहे. याबरोबरच हॉटेल क्षत्रिय ग्राहकांसाठी खास धम्माल ऑफर घेऊन आले आहेत.

बर्थ-डे पार्टी, मॅरेज अॅनिव्हर्सरी पार्टी, किटी पार्टी व इतर छोटेखानी कौटुंबिक समारंभासाठी तसेच कॉर्पोरेट मिटींगसाठी फ्री बँक्वेट हॉलची सुविधा देखील क्षत्रिय पुरवते. बर्थडे व मॅरेज अॅनिव्हर्सरी समारंभासाठी कॉम्प्लीमेंटरी म्हणून केकदेखील फ्री दिला जातो.

30 पेक्षा जास्त लोकांच्या इव्हेंटसाठी मर्यादित स्वरुपात डेकोरेशनची सोयसुद्धा क्षत्रियतर्फे पुरविली जाते. जेवणानंतर पानाचा स्वादही मोफत दिला जातो. मिटींगसाठी प्रशस्त वातानुकुलित हॉलची सेवा देखील उपलब्ध आहे. टाटा एम्प्लॉईज आणि परिवारासाठी, कॉलेज स्टुडन्टस, महिला बचत गट, आजी-माजी भारतीय सैनिक व परिवारासाठी खास 5 % सुट दिली जाते.

ग्राहकांचे हित हेच आमचे समाधान हे ब्रीद वाक्य मानून ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा देण्यासाठी क्षत्रिय नेहमी तयार असते. हॉटेल क्षत्रियमध्ये नियमित येणाऱ्या खवय्या ग्राहकांसाठी (Hotel Kshatriya) खास रेफरल कार्डची सुविधा दिली असून हे कार्ड घेऊन येणाऱ्यास 5% डिस्काउंट दिला जाईल.

योग्य दरात चवदार जेवण ते पण खास ऑफरसह मग वाट कसली बघताय? आवर्जून आजच हॉटेल क्षत्रियला भेट द्या. अन् जिभेवर रेंगाळणाऱ्या रुचकर चवीचा आनंद घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क-

हॉटेल क्षत्रिय, क्षत्रिय चौक, जुन्या आर. टी. ओ. शेजारी, टाटा कार प्लांट गेटसमोर, पूर्णानगर, चिंचवड, पुणे-19.

संपर्क –  9028104499/9028194499

Latest news
Related news