Moshi : हॉटेल चालकाला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – हॉटेलमधील दोन कामगारांना शिवीगाळ करून मारले. तर हॉटेल चालकाला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 5) दुपारी चारच्या सुमारास आळंदी रोडवरील हॉटेल दाजीबा, मोशी येथे घडली.

हॉटेल चालक शुभम दत्तात्रय गवस (वय 21, रा. मोशी. मूळ रा. तेरवन, ता. चंदगड, जि. कोल्हापूर), कामगार विठ्ठल माधवराव बेलकर, छोटू हालदार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अशी जखमींची नावे आहेत. शुभम यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश सस्ते, दिनेश सस्ते (दोघे रा. सस्तेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी शुभम त्यांच्या हॉटेलच्या काउंटरवर बसले होते. त्यावेळी आरोपी हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेल मढी कामगार विठ्ठल आणि छोटू यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर शुभम यांना कु-हाडीच्या दांड्याने मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.