Nigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागामधील ‘द ओरियन अॅपेटाइट’मध्ये पूर्वेकडील देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी

एमपीसी न्यूज- असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याचप्रमाणे प्रत्येकाची खाण्याची आवड देखील वेगवेगळी असते. कोणाला खमंग आवडते तर कोणाला चमचमीत तर कोणाला गोडावर मनसोक्त ताव मारायचा असतो. तर कोणी फक्त पोट भरण्यापुरते खातो, त्याला काही विशिष्ट आवडीनिवडी नसतात. काही जणांना तर नेहमी काहीतरी व्हरायटी हवी असते तर काही मोजून मापून खातात. लोकांची ही वेगवेगळ्या चवीचे खाण्याची आवड पुरवण्यासाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये नेहमी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हेच सूत्र सांभाळून सध्या तेथे ‘द ओरियन अॅपेटाइट’ हा ओरिएन्टल फूड फेस्टिव्हल सुरु झाला असल्याची माहिती हॉटेल रागाचे राहुल गावडे यांनी दिली. संपूर्ण मार्च महिनाभर हा फेस्टिव्हल सुरु असून या निमित्ताने येथे येणा-या आणि येथे नव्याने भेट देऊ इच्छिणा-या खवय्यांना पूर्वेकडील देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे.

थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, चीन, जपान, म्यानमार या दक्षिण पूर्व देशांमधील खास पाककृतींनी सजलेल्या या ओरिएन्टल फूड फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या डिशेस आपल्याला ट्राय करता येतील या पदार्थांमध्ये मुख्यत्वे नूडल्स आणि भरपूर भाज्यांच्या समावेश असतो. त्याच्या जोडीला वेगवेगळे सॉसदेखील वापरले जातात, आपल्याला चायनीज पदार्थांमुळे सोया सॉस, चिली सॉस माहिती असतेच. पण थायी पदार्थांमध्ये मुख्यत्वे फिश सॉस, ऑयस्टर सॉसचा वापर केला जातो. आपल्या जेवणाची सुरुवात आपण गरमागरम सूपने करतो. येथे बेसिल करी सूप, ग्लास नूडल्स सूप, तिबेटियन क्लिअर सूप आणि खाऊ स्ये हे युनिक बर्मीज सूप आहे. चिकनचे छोटे क्यूब, बेबी कॉर्न, मश्रूम, ब्रोकोली अशा भाज्या, कुरकुरीत शेंगदाणे, नारळाचे दूध आणि मस्त तिखटगोड चव असलेले हे वेगळेच पण पोट भरुन टाकणारे सूप मस्ट ट्राय या सदरात मोडणारे.
सूपनंतर सलाड खाल्ले जाते. यातदेखील कोरियन चिकन सलाड हे खास मिझो पेस्ट किम ची आणि चिकनपासून तयार केलेले सलाड येथे आहे. तसेच सॉम तम हे सिग्नेचर थाई डिश असे मानले जाणारे कच्च्या पपईपासून बनवण्यात येणारे अप्रतिम चवीचे आणि वेगळेच असे सलाडदेखील खवय्यांनी चव घेऊन पहायलाच हवे.

स्टार्टर्समध्ये तर खूपच व्हरायटी आहे. यातील नाम प्रिक चिकन, पेपर चिकन, प्रॉन्स टेम्पुरा ही जपानी भजी अशी मानली जाणारी डीश, नूडल्स रॅप चिकन, चिली बेसिल फिश, लेमन ग्रास फिश, फ्राइड मोमोज, थाई स्प्रिंग रोल, चिली बिन टोफू आणि हनी चिली पोटॅटो असा डीशेस उपलब्ध आहेत. यातील मोमोज आणि तिखट चवीचे नाम प्रिक चिकन ही थायी डिश चाखून पाहायलाच हवी. चिकनचे सारण भरलेले कुरकुरीत मोमोज त्यासोबत मिळणा-या चिली सॉससोबत अप्रतिम लागतात आणि पोटभरीचा आनंद देतात. मोमोज, डिमसम आपल्याकडील मोदक हे दिसायला जरी थोडेफार सारखे असले तरी चवीला मात्र खूपच वेगळे असतात. कारण मोदक बनतात कणीक, तांदळाचे पीठ यापासून तर मोमो बनतात मैद्यापासून. आणि मोमोजमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे सारण भरले जाते.

सूप, स्टार्टसनंतर वेळ येते ती मेन कोर्सची. येथे यातदेखील खूप वैविध्य आहे. मुळातच या पूर्वेकडील देशांमधील लोक आपल्यासारखेच खवय्ये असतात. त्यांचे मुख्य अन्न भात, भाज्या, नूडल्स असेच असते. त्यातच मग वेगवेगळी कॉम्बिनेशन केली जातात. मेन कोर्समद्ये व्हिएतनामी चिकन करी, मलेशिएन रॅन्डॅंग चिकन, चिकन, फिश, प्रॉन्सची थाई करी, स्टीम क्रॅब, सिंगापूर चिली क्रॅब, चिली स्कॅलियन क्रॅब या मांसाहारी डिश येथे आहेत. ओलं आणि सुकं खोबरं, ऑयस्टर सॉसच्या अफलातून मिश्रणाने बनलेले मलेशिएन रॅन्डॅंग चिकन चव घेऊन पाहायलाच हवे असे. तसेच स्पायसी खाणे आवडणा-यांनी नाम प्रिक सॉसमध्ये बनवलेला स्टीम क्रॅब ही थाई डीश आणि सिंगापूर चिली क्रॅब खाऊन पाहायलाच हवा.

शाकाहारी लोकांसाठी देखील येथे खास डिशेस उपलब्ध आहेत. एक्झॉटिक चिली बेसिल व्हेज, व्हेजिटेबल्स इन पेपर सॉस आणि बीन सॉस, थाई करी आणि इंडोनेशियन करी या डिशेस येथे आहेत. यातील वेगवेगळ्या सॉसच्या चमचमीत चवीने बनलेल्या थाई आणि इंडोनेशियन व्हेज करी खायलाच हव्यात.

मेन कोर्सनंतर वेळ येते ती राईस आणि नूडल्सची. यात नासी गोरॅंग हा इंडोनेशियन स्पायसी व्हेज, प्रॉन्स, चिकन या तिन्ही प्रकारात मिळणारा राईस खाल्ल्यावर तृप्त झाल्याचे फिलिंग आल्याशिवाय राहात नाही. तीच गोष्ट फाड थाई या थाई डिशची. चकचकीत राईस नूडल्सपासून बनलेला हा पदार्थ तृप्तीची ढेकर देणाराच आहे. पॅनफ्राइड नूडल्स हा आणखी एक वेगळाच पदार्थ येथे आहे. सनी साइड अप एग, भाज्या आणि श्रिंप पेस्ट यांचे मस्त मिश्रण तव्यावर कुरकुरीत केलेल्या नूडल्सवर पसरवलेले असते. बघताक्षणी लक्ष वेधणारी ही डिशदेखील मस्ट ट्राय या प्रकारातीलच. याशिवाय येथे यांग चाऊ फ्राईड राइस, कोरियन फ्राईड राइस, लेमन ग्रास राइस उपलब्ध आहे अशी माहिती विशाल यादव यांनी या फूड फेस्टिव्हलच्या निमित्ताने दिली.

भरपेट जेवल्यानंतर गोड तर हवेच. त्यासाठी देखील येथे हनी नूडल्स विथ आईस्क्रीम आणि गोल्डन डेट पॅनकेक हे पर्याय आहेत. मध लपेटलेल्या नूडल्स आईस्क्रिमच्या साथीने खाताना ब्रह्मानंदी टाळी लागल्याशिवाय राहणार नाही. तीच गत खजुरांपासून बनवलेल्या पॅनकेक खाताना होते.

आपल्याकडील खाद्यसंस्कृतीशी नाते सांगणा-या दक्षिण पूर्वेकडील खाद्यसंस्कृतीत खूप वैविध्य आहे. नारळाचे दूध, शेंगदाणे, आंबट गोड चव हे साधर्म्य तर वेगवेगळ्या चवीचे सॉस हे वेगळेपण या खाद्यसंस्कृतीत आहे. पण हे खाद्यपदार्थ समतोल साधणारे नक्कीच आहेत. मग बच्चेकंपनीच्या परीक्षा संपत आल्या आहेत, त्यांना हळूहळू सुट्ट्या सुरु होतील. परदेशी फिरण्याचे बेत आखत असताना तिथल्या खाद्यसंस्कृतीशी ओळख करुन घ्यायची असेल तर प्राधिकरण येथील हॉटेल रागामधील ओरिएन्टल फूड फेस्टिव्हलमधील द ओरियन अॅपेटाइट या खास पूर्वेकडील देशांमधील पदार्थांची ओळख करुन देणा-या या वैशिष्ट्यपूर्ण फूड फेस्टिव्हलला भेट द्यायलाच हवी.

हॉटेल रागा,
स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी,
फोन – 8888077799 ,020 27657799

https://goo.gl/maps/2M8LPhfLamG2

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.