Bhosari News : पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये काम करणा-या महिलेचे आणि हॉटेल व्यावसायिकाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय कामगार महिलेच्या पतीला होता. त्यातून पतीने हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ, धमकी देत सिमेंटच्या विटेने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री गुडविल चौक, एमआयडीसी भोसरी येथील गोकुळ स्नॅक्स सेंटर नावाच्या हॉटेलमध्ये घडली.

राजेश भंडारी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रताप अभिमान्या दहितुले (वय 36, रा. कासारवाडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश याची पत्नी फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये काम करत होती. त्याच्या पत्नीचे आणि फिर्यादी यांचे प्रेमसंबंध असल्याचा आरोपी राजेश याला संशय होता. त्या संशयावरून बुधवारी रात्री साडेसात वाजता आरोपी राजेश फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आला. त्याने त्याच्या पत्नीसोबत भांडण केले. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ, धमकी देऊन हाताने मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरील सिमेंटच्या विटेने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.