Hotels to Reopen : 8 जुलैपासून 33 टक्के क्षमतेसह राज्यात हॉटेल्स आणि लॉजेस सुरू करण्यास परवानगी

Permission to start hotels and lodges in the state with 33 per cent capacity from July 8

एमपीसी न्यूज – ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आता काही उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे. तसेच राज्यात 33 टक्के क्षमतेसह हॉटेल्स आणि लॉजेसना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रेस्टॉर्ंट्सना अजूनही परवानगी दिली गेलेली नाही.

लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंदे पूर्णपणे बंद करण्यात आले होते.त्यानंतर मिशन बिगीन अगेनमध्ये काही अंशी उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्यात आली नव्हती. आता राज्यातील हॉटेल्स आणि लॉजिंग सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

8 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, रेस्टॉरंट्सना अद्याप तरी परवानगी देण्याचा निर्णय झालेला नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

मुंबई, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांसाठी, तसंच महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळ्या अटी घालण्यात आल्या आहेत, याला कारण तिथली लोकसंख्या आणि कोरोनाची परिस्थिती हे सुद्धा असू शकतं. या ठिकाणच्या केवळ कंटेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेल्सना ही परवानगी दिली गेली आहे.

यात हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉजमध्ये 33 टक्के क्षमतेने ग्राहकांना राहण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. उर्वरित विभागांसाठीदेखील हीच 33 टक्क्यांची अट लागू होणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित 67 टक्के क्षमता ही क्वॉरंटाईन करण्यासाठी वापरण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉजमध्ये कोणाला परवानगी

– कोरोना संबंधित लक्षणे नसणाऱ्या लोकांना परवानगी दिली जाणार आहे.

– अभ्यागतांना मास्क घालणे बंधनकारक राहणार तसेच त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री यांची नोंद ठेवावी लागणार.

– अभ्यागतांना आरोग्य सेतू ॲप्लिकेशन वापराने बंधनकारक राहणार आहे.

स्वच्छता, सॅनिटायझेशन

– प्रत्येक अभ्यागताच्या भेटी नंतर खोलीचं सॅनिटायझेशन आणि टाॅवेल बदलने बंधनकारक आहे.

– सारखा स्पर्श होणार्या वस्तू 1% सोडियम हायपो क्लोराईड वापरून स्वच्छ करणे आवश्यक राहणार आहे.

– स्वच्छतागृह वारंवार स्वच्छ करणे तसेच मास्क, हॅन्ड ग्लोज यांचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.