Pune : उष्णतेच्या लाटेचा कहर…. पुण्याचे तापमान 52 वर्षांनी @ 43 अंश सेल्सियस!

एमपीसी न्यूज – उष्णतेच्या लाटेने आज पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अक्षरश: कहर केला. तापमापकातील पाऱ्याने 43 अंश सेल्सियसचा टप्पा गाठत 52 वर्षांपूर्वीच्या तापमानाची बरोबरी केली. पुण्यातील आतापर्यंतच्या सर्वांत उष्ण दिवसांपैकी हा सहावा दिवस असून सर्वोच्च तापमानांपैकी हे तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे.

गेल्या तीन दिवसांत तापमापकातील पारा 42 अंशाच्या वर राहिला आणि तिन्ही दिवस आणखी वर जात आज 43 अंशांचा टप्पा गाठला. आता कमाल तापमानातील वाढीवर मर्यादा येऊन तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पुण्यात 43 अंश तापमान असताना राज्यात आज सर्वाधिक म्हणजे 47.2 अंश सेल्सियस तापमान अकोला, चंद्रपूर, परभणी या तीन ठिकाणी नोंदविले गेले आहे.

पुण्यातील आतापर्यंतचे ‘हॉटेस्ट डे’

43.3 = 30 एप्रिल 1897

_MPC_DIR_MPU_II

43.3 =  7 मे 1889

43.2 = 24 एप्रिल 1958

43.2 =  8 मे 1960

43.0 = 10 मे 1967

(साभार – भारतीय हवामानशास्त्र विभाग)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.