Talegaon Dabhade: भरदिवसा 51 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – घराचा कडी-कोयंडा उचटकून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा 51 हजारांचा ऐवज भरदिवसा लंपास केला. हा प्रकार गुरूवारी (दि. 12) दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान तळेगावदाभाडे येथील यशवंतनगर येथे घडला.

याप्रकरणी तुषार महादेव सहस्त्रबुध्दे (वय 52, रा. शालिनी अपार्टमेंन्ट, यशवंतनगर) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तुषार सहस्त्रबुध्दे यांचा मुलगा गुरुवारी घराला कुलूप लावून क्लासला गेला होता. घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरटे घरात घुसले. कपाटातील सोन्याचे दागिने, साडेचार हजारांची रोकड असा 51 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार अतिग्रे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.