House Breaking News : पाच घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीला

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्यांचे प्रकार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. बुधवारी (दि. 13) चाकण, भोसरी, वाकड, हिंजवडी आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात पाच घरफोडीचे प्रकार उघडकीस आले. यात एकूण तीन लाख 24 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात कविता अंकुश रडके यांनी (वय 39, रा. भोसे, ता. खेड) फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून 65 हजारांची रोख रक्कम, आधारकार्ड, मतदानकार्ड चोरून नेले. हा प्रकार बुधवारी (दि. 13) दुपारी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात प्रदीप लक्ष्मण बाबर (वय 53, रा. माणिक पार्क, बोपखेल गाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कंटेनरमधून १६ हजार रुपयांची लोखंडी वजनी मापे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 6 जानेवारी रोजी उघडकीस आला असून कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून 13 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात रिपुसदरन मनमोहन शर्मा (वय 25, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. शर्मा यांच्या घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण एक लाख 5 हजार हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात रघुनाथ गोविंद चव्हाण (वय 38, रा. गणेश कॉलनी, कासारसाई. मूळ रा. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 23 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू चोरून नेल्या. हा प्रकारही बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकास दिलीप तनमोरे (वय 25, रा. नवलाखउंब्रे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरातून सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम, असा 15 हजार 40 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी दुपारी साडेपाच ते सायंकाळी साडेसहा या एक तासाच्या कालावधीत घडला आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.