Nigdi burglary : निगडी येथे घरफोडीत दोन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील एका घरात चोरट्यांनी घरफोडी (Nigdi burglary) करून दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) मध्यरात्री उघडकीस आली.

गणेश बबन पाटील (वय 38, रा. गंगानगर, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri news : सांस्कृतिक लोकशाही शुद्ध राहिली तर राजकीय लोकशाहीला भवितव्य आहे – डॉ. श्रीपाल सबनीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाला होल करून दरवाजा उघडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. (Nigdi burglary) बेडरूम मधील लाकडी कपाटातून दोन लाखाची सोन्याची पाच तोळ्याची बोरमाळ व इतर दागिने चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.