Wakad News : घर खरेदीसाठी वाकडला सर्वाधिक पसंती

1 ते 2 कोटी रूपयांदरम्यानच्या घरांना ग्राहकांची वाढती मागणी

एमपीसी न्यूज – आपल्या स्वप्नातील नवीन घर खरेदी करण्यासाठी (Wakad News)पुण्यातील गृह खरेदीदारांची वाकड विभागाला सर्वाधिक पसंती असल्याचे एका  गृहप्रकल्प वेबसाइट वरील प्रॉपर्टी शोधातून निदर्शनास आले आहे. या गृहप्रकल्प वेबसाइट वरील 2022 मध्ये निवासी मालमत्तांसाठी शोधाच्या संदर्भात पहिल्या दहा ठिकाणांमध्ये वाकडचा 8 वा क्रमांक लागतो. यात शीर्षस्थानी ठाणे पश्चिम विभाग असून नंतर बेंगळुरूमधील व्हाइटफिल्ड आणि दिल्ली-एनसीआरमधील नोएडा एक्स्टेन्शन यांचा क्रमांक लागतो. तर कोलकातामधील न्यू टाऊन आणि मुंबईमधील मीरा रोड पूर्व अनुक्रमे 4 थ्या व 5 व्या स्थानावर होते. अहमदाबादमधील चांदखेडा6 व्या स्थानावर होते आणि नवी मुंबईतील खारघर, अहमदाबादमधील गोटा आणि अहमदाबादमधील वस्त्राल यांचा क्रमांक होता.

 

 

2022मध्ये वाकड येथे 1  ते 2 कोटीदरम्यानच्या निवासी मालमत्तांसाठी शोधांमध्ये वार्षिक 24 टक्क्यांची वाढ झाली. तसेच गृहखरेदीदारांनी नवीन सदनिकांसाठी शोध घेण्यासोबत मागील वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये चौकशी 52 टक्क्यांनी वाढली. 2022मध्ये रिसेल मालमत्तांसाठी चौकशीमध्ये वार्षिक 2टक्क्यांची घट झाली. 2022 मध्ये 3 बीएचके व त्यावरील कन्फिग्युरेशन असलेल्या मालमत्तांसाठी ऑनलाइन शोध 1.4 पट वाढले.

 

 

H3N2 : पिंपरी-चिंचवडमध्ये एच3एन2 मुळे वृद्धेचा मृत्यू; काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

 

 

 

 

 

एका  गृहप्रकल्प वेबसाइट ने केलेल्या शोधांपैकी 60 टक्के ग्राहक निवासी मालमत्ता खरेदी करू पाहत होते, तर उर्वरित 40 टक्के ग्राहकांची भाड्याने घर घेण्याची इच्छा होती. गृहखरेदीसंदर्भात 50 लाख रूपयांखालील सदनिकांना अधिक प्राधान्य देण्यात आले, जेथे या किंमतीच्या श्रेणीमध्ये अधिकाधिक शोध दिसण्यात आले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.