Housing Federation : ओला कचरा उचलणे बंद केल्यास सर्व कचरा पिंपरी-चिंचवड मनपाच्या समोर आणून टाकणार

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाउसिंग सोसायट्यांच्या (Chikhli Moshi Housing Federation) अडचणी, मागण्या व विनंती समजून घेऊन मार्ग काढल्यानंतरच मोठ्या सोसायट्यांकडून ओला कचरा घेणे बंद करावे. अन्यथा कोणत्याही सोसायटीमधील ओला कचरा उचलणे बंद केल्यास चिखली, मोशी हाऊसिंग फेडरेशन सर्व ओला कचरा पिंपरी-चिंचवड मनपाच्या समोर आणून टाकणार, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर पत्र चिखली-मोशी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी मनपा आयुक्त यांना ईमेलद्वारे पाठवले आले आहे. अशी माहिती सांगळे यांनी दिली. ‘प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानां’तर्गत 2016 पासून मोठ्या प्रमाणात ओला कचरा उत्पन्न करणाऱ्या संस्थांना घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या संस्थेने कचरा स्वतःच जिरवायचा आहे. याबाबत पिंपरी चिंचवड मनपाने गृह प्रकल्पांच्या विकासकाला (बिल्डरला) त्यांचा गृहप्रकल्प करताना काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत.

2016 पासून असे मोठे गृह प्रकल्प ज्या विकसकाने विकसित केलेले आहेत, त्यांनी त्यांच्या गृहप्रकल्पात ओला कचरा विघटन प्रकल्प उभारणे अनिवार्य केलेले आहे. असे ओला कचरा विघटनाचे प्रकल्प जर त्या विकसकानी त्यांच्या गृह प्रकल्पात उभारले नसतील, तर त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही, अशी अट असताना देखील मनपाच्या बांधकाम विभागाने त्यांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. या सर्व कर्तव्यात कसूर केलेल्या मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फेडरेशनने केलेली आहे. तसेच, या विकसकांनी नियम व अटींचा भंग केला म्हणून त्यांच्यावर दंड ठोठवावा व त्वरित हे प्रकल्प उभारण्याचे त्यांना आदेश द्यावेत.

तोपर्यंत सदर विकसकाचे बांधकाम (Housing Federation) परवाने व बांधकाम परवाने स्थगित करावेत. जोपर्यंत अशा सोसायट्यांमध्ये विकसक असे प्रकल्प उभारून देत नाहीत आणि ज्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कोणत्याही सोसायटीमध्ये ओला कचरा उचलणे बंद करू नये. अन्यथा, हा सर्व कचरा आपल्या मनपाच्या समोर आणून टाकला जाईल, असा इशारा फेडरेशनने दिलेला आहे.

विकसकाने कोणत्याही मोठ्या सोसायटीमध्ये एक इंचही जागा मोकळी सोडलेली नाही. मग हे प्रकल्प उभारायचे कुठे? याबाबत आयुक्त स्तरावरून मार्गदर्शन मिळावे अशी विनंती फेडरेशनने केली आहे. सोसायटीमध्ये हे प्रकल्प उभारण्यासाठी असलेली जागेची कमतरता तसेच निर्माण होणारा वास, खर्चिक बाब, रोजचा वाढणारा खर्च इत्यादी गोष्टींचा व्यवहारिक विचार करून सोसायटीच्या अडचणी समजून घेऊन मध्यप्रदेशच्या इंदोर शहराच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड मनपा स्तरावरच प्रत्येक वर्गात तसे कचरा विघटन प्रकल्प उभारावेत. त्यासाठी सोसायटीधारकांच्या मालमत्ता करामध्ये प्रत्येक महिना थोडी वाढ केली तरी ती देण्यास फेडरेशन तयार आहे.

पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनशी संलग्न एकूण 738 हाउसिंग सोसायटी आहेत. त्यापैकी 100 पेक्षा अधिक असणाऱ्या 600 हाउसिंग सोसायटी आहेत. त्यामध्ये दीड ते दोन लाख नागरिक राहत आहेत. सर्व अडचणी-समस्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सोसायट्यांना तीन महिन्याचा अवधी द्यावा. फेडरेशन सोबत प्रशासनाने मिटिंग घेऊन एकमेकांना सहकार्य करून समन्वयाने काम करून हा (Chikhli Moshi Housing Federation) प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती फेडरेशनने आयुक्तांना केली आहे.

Today’s Horoscope 27 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.