BNR-HDR-TOP-Mobile

सदगुरु व्हॅली – स्वप्नातील घरकुल प्रत्यक्षात आणण्यासाठी करा प्लॉट खरेदी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- आपल्या मनातील घरकुल प्रत्यक्षात यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. असावे घरकुल अपुले छान असे सगळ्यांनाच वाटते. या घरासभोवती मनासारखी बाग करता येईल, संध्याकाळी गप्पा मारता मारता चहा पिता येईल, मित्रमंडळींना जमवून पार्टी करता येईल असे आपले एक स्वप्न असते. पण शहरातील छोट्याशा फ्लॅटमध्ये हे स्वप्न पूर्ण करणे अवघड जाते. म्हणून मग स्वप्नातील घरकुल प्रत्यक्षात आणायचे असेल तर तुम्हाला प्लॉट घ्यायला हवा. असा निसर्गरम्य ठिकाणी प्लॉट घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी सदगुरु डेव्हलपर्स खास प्लॉटची योजना घेऊन आले आहेत. मावळातील टाकवे -कान्हे येथे आठ एकरातील प्रशस्त अशा सदगुरु व्हॅली या योजनेत एक गुंठ्यापासून ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध आहेत.

मुंबई – पुणे महामार्गापासून जवळ, निसर्गरम्य वातावरणात आठ एकरातील प्रशस्त अशा सदगुरु व्हॅली या प्रकल्पात एक गुंठ्यापासून अकरा गुंठ्यांचे क्लिअर टायटल बंगलो प्लॉटस् उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवडपासून हा प्रकल्प सुमारे पंचवीस किमी अंतरावर आहे. या प्रकल्पाची अनेक ठळक अशी वैशिष्ट्ये आहेत. आकर्षक गेट, गार्डन, मंदिर येथे आहे. तसेच तीस फुटी मुख्य रस्ता व वीस फुटी अंतर्गत रस्ते, वीज व पाण्याची सोय, संपूर्ण प्लॉटला सुरक्षित कंपाउंड, वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॉट व रस्ते, प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन, प्लांटेशनची सुविधा येथे आहेत. तसेच प्लॉटधारकाच्या मागणीनुसार मनपसंत बंगलो बांधून देण्याची आणखी एक खास सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे. सदगुरु डेव्हलपर्सच्या ऑफिसपासून दररोज साइट व्हिजीटची सोय उपलब्ध आहे.
सदगुरु डेव्हलपर्सतर्फे २००८ पासून आत्तापर्यंत सुमारे २२ प्रकल्प पूर्ण केलेले असून सुमारे दहा हजार समाधानी ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील मनपसंत घरकुल देण्याचे काम केले आहे. क्लअर टायटल जमिनीच्या शोधापासून सदगुरु डेव्हलपर्सचे काम सुरु होते. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या जमिनी ग्राहकांना सुपूर्द केल्या जातात. तसेच ग्राहकांना प्रकल्पात दिल्या जाणा-या सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या व टिकाऊ असतात. खरेदी विक्रीचे व्यवहार पारदर्शक पद्धतीने केले जातात. प्लॉट विक्री नंतरची सेवा देखील प्लॉटखरेदीइतकीच महत्वाची मानली जाते, अशी माहिती सदगुरु डेव्हलपर्सचे मालक, संचालक केशव वि. साळुंखे यांनी दिली.

मावळातील दुसरे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणा-या या ठिकाणी प्रस्तावित कर्जत नाशिक हायवे जवळूनच जाणार आहे. तसेच प्रकल्पापासून जवळच शासनाने आयुर्वेदिक कॉलेजची उभारणी करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाशेजारीच हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्रींचे बंगले आहेत. टाटा डॅमचे बॅकवॉटरलगत असलेल्या या प्रकल्पात आता थोडेच प्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे निराशा टाळण्यासाठी आणि आपल्या मनाजोगता प्लॉट निवडण्यासाठी साइटला लवकरात लवकर भेट द्या आणि विनासायास प्लॉटचे बुकिंग करुन टाका.

बुकिंग करताना फक्त दहा टक्के रक्कम भरा. चाळीस टक्के रक्कम खरेदीखताच्या वेळी व उर्वरित पन्नास टक्के रक्कम दोन वर्षांच्या सुलभ हप्त्यांमध्ये भरा. जर हप्त्यांची सुविधा नको असेल तर रोख खरेदीसाठी वीस टक्के सवलत मिळवा.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क साधा –
9096134444, 8788743090, 9764282449

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement