राजेशाही घरे आणि सौंदर्यदृष्टी यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली गृहरचना म्हणजे तनिष्क विलास्टा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- तनिष्क रिअॅलिटीजचा तनिष्क विलास्टा हा आळंदी येथील एक उत्कृष्ट गृहप्रकल्प आहे. आळंदीचे महत्व लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे एक व दोन बेडरुम, हॉल, किचन अशा सदनिका आहेत. लोकांची गरज काय आहे हे नीट लक्षात घेऊन ही घरे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकल्पात आम्ही फुल्ली फर्निशड् घरे लोकांना देत आहोत. तसेच गुढीपाडव्याला घर बुक करणा-या पहिल्या २५ भाग्यवंत ग्राहकांना ज्युपिटर ही स्कूटर भेट देण्यात येणार आहे. आम्ही लोकांच्या भावनेला जास्त महत्व देत असल्याने त्यांना हवी तशीच घरे या प्रकल्पात निर्माण करण्यात आली आहेत. येथील सदनिकांमध्ये सोय व सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ करण्यात आला आहे.

तनिष्क रिअॅलिटीजमार्फत उभारण्यात येणा-या या प्रकल्पात आम्ही आमचा मागील दहा वर्षांचा बांधकाम क्षेत्राचा अनुभव वापरुन सुंदर घरांची निर्मिती केली आहे. या दहा वर्षांत आम्ही जे कबूल केले ते सगळे आमच्या गृहप्रकल्पात समाविष्ट करुन लोकांना दिले आहे. दर्जा, सेवा आणि पारदर्शकता या आमच्या तीन मार्गदर्शक तत्वांमुळे बांधकाम क्षेत्रात आम्ही एक मानदंड प्रस्थापित केला आहे. पिंपरी चिंचवड परिसरात आमचे अनेक उत्तमोत्तम प्रकल्प पूर्णत्वाला गेलेले आहेत.

तनिष्क विलास्टा या गृहप्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. येथे दिमाखदार व भव्य असे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याशिवाय क्लबहाऊस, लोटस पूल, बहुउद्देशिय हॉल, पार्टी लॉन, जिम, इनडोअर खेळांची सुविधा, जलतरण तलाव आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची मोकळी जागा, व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी मोकळी जागा, खेळांसाठी वेगळी जागा, उत्कृष्ट लॅंडस्केप संरचना, अंतर्गत मोकळी जागा, डांबरी र्ते, स्ट्रीट लाईट, गझीबो, औषधी वनस्पतींचे उद्यान, अॅम्फीथिएटर, एटीएम सुविधा, संपूर्ण प्रकल्पासाठी वेगळा ट्रान्सफॉर्मर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टीम, पाणी व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प यासारख्या अत्याधुनिक आणि आवश्यक सुविधा येथे देण्यात येणार आहेत.

इंद्राय़णी नदीच्या तीरावर वसलेले आळंदी हे एक पवित्र तीर्थस्थान आहे. तसेच येथे आता मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढीला लागले आहेत. तसेच येथून विमानतळ, पिंपरी चिंचवड, द्रुतगती महामार्ग, भोसरी एमआयडीसी जवळ आहे. त्यामुळे येथे लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. या प्रकल्पासून संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, जलाराम महाराज मंदिर, भाजी मार्केट, मरकळ एमआयडीसी, पुणे स्टेशन जवळ असल्याने तनिष्क विलास्टा हा प्रकल्प अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like