BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : गृहनिर्माण सोसायट्या, दुकानांच्या आवारात कचरा साचल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने, आस्थापनांनी कचरा महापालिकेच्या वाहनांमध्येच जमा करावा. आस्थापनाच्या परिसरामध्ये कचरा टाकू नये. आसपासच्या परिसरात कचरा गोळा झाल्यास आस्थापना, दुकानांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खासगी दुकाने, व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार शहरामध्ये कच-याची विल्हेवाट लावण्याकरिता पद्धत विहित करण्यात आलेली आहे. तथापि, अनेकदा व्यावसायिक आस्थापनांमार्फत नजिकच्या परिसरामध्ये कचरा टाकला जात आहे. विहित पद्धतीने कच-याची विल्हेवाट लावली जात नाही. त्याचबरोबर महापालिकेमार्फत कचरा संकलनाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या वाहनांकडे कचरा जमा करत नसल्याचे दिसून आले आहे.

खासगी दुकाने, इतर व्यावसायिकांनी त्यांच्या मार्फत उत्पन्न होणारा कचरा महापालिकेच्या वाहनांमध्येच जमा करावा. तसेच आसपासच्या परिसरामध्ये कचरा गोळा झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3