Omicron Varient : ‘ओमिक्रॉन’ खरंच किती भयंकर? WHO ने याबाबत काय म्हटलंय?

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिंटमुळे जगासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. नव्यानं सापडलेला हा व्हेरिंट डेल्टा व्हेरिंट पेक्षा जास्त घातक असल्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. पण, याबाबत अद्याप अभ्यास सुरू असल्याने पुरेशी माहिती उपलब्ध नाही. उपलब्ध माहितीच्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन व्हेरिंटबाबत काही माहिती दिली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन व्हेरिंटबाबत दिलेल्या माहितीनुसार

1) यापूर्वी कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना ओमिक्रॉन संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे.

2) ओमिक्रॉन डेल्टा व्हेरिंट पेक्षा किती संसर्गजन्य आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तसेच, केवळ आरटीपीसीआर चाचणीतून या संसर्गाची माहिती मिळू शकते.

3) कोरोना प्रतिबंधक लसीचा ओमिक्रॉन व्हेरिंटवरती होणा-या परिणामांचा अभ्यास सुरू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

4) ओमिक्रॉन संसर्गामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे की नाही याबाबत देखील माहिती उपलब्ध नाही. तसेच, ओमिक्रॉनची लक्षणे इतर व्हेरिंट पेक्षा वेगळी असल्याचेही आढळून आलेले नाही.

5) दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या रुग्णांची संख्या ओमिक्रॉन असेल असे म्हणता येणार नाही. ओमिक्रॉन व्हेरिंटची गंभीरता समजून घेण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.

6) कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि IL6 रिसेप्टर ब्लॉकर्स गंभीर कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी अजूनही प्रभावी आहेत. ओमिक्रॉन प्रकारातील व्हायरसच्या काही भागांमध्ये झालेले बदल पाहता ते अजूनही तितकेच प्रभावी आहेत की नाही हे पाहण्यासाठी इतर उपचारांचे मूल्यांकन केले जाईल.

7) सध्या, WHO ओमिक्रॉनला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी जगभरातील संशोधकांशी समन्वय साधत आहे. सध्या सुरू असलेल्या अभ्यासात संक्रमणाची तीव्रता, लक्षणे, लसींची कार्यक्षमता, चाचण्या आणि उपचारांची परिणामकारकता याबाबत संशोधन केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.