Chinchwad : एचआर कनेक्ट असोसिएशन आयोजित इंडस्ट्रियल रिलेशन कोड बील विषयावरील चर्चासत्र उत्साहात

एमपीसी न्यूज – एचआर कनेक्ट अससोसिएशनच्या मार्फत दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी हॉटेल स्प्री शिवाई, चिंचवड येथे नवीन वर्षात एचआर क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी इंडस्ट्रियल रिलेशन कोड बील या विषययावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रास प्रमूख पाहुणे विलास घोघरे (डेप्युटी डायरेक्टर-औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित राहिले. 

तसेच या चर्चासत्राचे वक्ते कायदेसल्ल्गार ऍडव्होकेट आर. एम. निर्मल, ऍडव्होकेट आदित्य जोशी हे लाभले. कामगार कायद्यामध्ये सध्या बरेच बदल होत आहेत त्याला अनुसरूनच नवीन इंडस्ट्रियल रिलेशन कोड बील लवकरच येत आहे. त्यामध्ये होणारे बदल काय आहेत व मध्ये कारखान्यांच्या मालकांसाठी कायद्यामध्ये काय बदल होत आहे व कामगारासाठी काय बदल सूचित केला आहे. सध्या हे बिल पार्लमेंटमध्ये मान्यतेसाठी मांडले आहे.

दोन्ही वक्त्यांनी अतिशय सोप्या भाषेत होणारे बदल समजावून सांगितले आणि काम करत असताना एचआर अधिकाऱ्यांनी काशा प्रकारे रोल केला पाहिजे याची माहिती दिली. कामगार -कर्मचारी आणि मालक यांच्यामधील पदोपदीच्या प्रश्नांवर जबाबदाऱ्या कोणत्या, आपले हक्क कोणते याविषयी दोघांच्या मनामध्ये अनेकदा गोंधळ उडत असतो. तसेच काळानुसार नुसार कायद्यात सुधारणा व्हावी, असे दोघांना वाटत असते त्यासाठीच हा बदल सुचवला आहे.

साधारण हे बील ट्रेड युनियन, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट अॅक्ट या कायद्यामध्ये बदल सूचवले आहेत त्याचा खुलासा दोन्ही कायदे पंडितांनी सोप्या भाषेत सर्वासमोर मांडला. या चर्चासत्रासाठी साधारण १५० एचआर क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. वेळोवेळी एचआर कनेक्ट अससोसिएशनच्या मार्फत विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित केले जाते. त्यामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, कायदेविषयक व विकसनशीलतेसाठी आवश्यक असणारे उपक्रम राबले जातात व पुढेही राबवण्याचा मानस आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एचआर कनेक्ट अससोसिएशनचे अध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष अनिल भोईटे, सचिव वनराज भोसले, सहसचिव सतीश पवार, सहखजिनदार अर्जुन माने, कार्यकारिणी सदस्य चेतन मुसळे, शिवाजी चौंडकर, मधुकर सूर्यवंशी, आत्माराम बोचरे, धीरज अधिकारी, सोपान फरांदे, निशिकांत काटकर, संतोष बर्गे अर्चना देशमुख, आनंद जोशी, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देशमुख यांनी केले व आभारप्रदर्शन मधुकर सूर्यवंशी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.