HSC exam Cancelled: इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, शिक्षण विभागाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला

एमपीसी न्यूज – राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव आपत्ती व व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा अधिकृतपणे रद्द झाली आहे.

बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. नंतर ती पुढे ढकलली होती. आता रद्द झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.