HSC Result 2020: यंदाही मुलीच अव्वल, राज्याचा निकाल 90.66 टक्के

HSC Result 2020: Girls still top this year, state result 90.66 percent कोकण विभागाने यंदा बाजी मारली असून त्यांचा निकाल 95.89 टक्के तर सर्वांत कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे.

एमपीसी न्यूज- बहुप्रतीक्षित इयत्ता बारावीचा बोर्डाचा निकाल आज (दि.16) जाहीर झाला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निकाल जाहीर केला. राज्याच्या निकालात यंदा 4.78 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.88 टक्के तर मुलांचा 88.04 टक्के इतका लागला. दरम्यान, दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन स्वरुपात पाहता येणार आहे.

कोकण विभागाने यंदा बाजी मारली असून त्यांचा निकाल 95.89 टक्के तर सर्वांत कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा 88.18 टक्के इतका लागला आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.

शाखानिहाय निकाल असा..
– कला शाखा निकाल : 83.63 टक्के
– वाणिज्य शाखा निकाल : 91.27 टक्के
– विज्ञान शाखा निकाल : 96.93 टक्के
– एमसीव्हीसी : 95.07 टक्के

 

पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
विज्ञान- 5,85,736, कला- 4,75,134, वाणिज्य- 3,86,784, व्होकेशनल- 57,373 असे एकूण 15,05,027 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे-
गुणपडताळणीसाठी अर्ज- 17 जुलै ते 27 जुलै
छायाप्रतीसाठी अर्ज- 17 जुलै ते 5 ऑगस्ट

View this post on Instagram

बहुप्रतीक्षित इयत्ता बारावीचा बोर्डाचा निकाल आज (दि.16 जाहीर झाला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निकाल जाहीर केला. राज्याच्या निकालात यंदा 4.78 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.88 टक्के तर मुलांचा 88.04 टक्के इतका लागला. दरम्यान, दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन स्वरुपात पाहता येणार आहे. #hscresult2020 #hscresult #hsc #maharashtraBoard #hscboard #maharashtrahscboard #highschool  #mpcnews #i_support_mpcnews

A post shared by MPC News Pvt. Ltd. (@mpcnews.in) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.