HSC Result : बारावीच्या जाहीर निकालावर आक्षेप असल्यास 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रारी असल्यास मंहामंडळाकडे तक्रार करता येणार आहे. 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावी आणि बारावीच्या लेखी परिक्षा रद्द करण्यात आला होत्या. त्यामुळे सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार 24 जूनला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रारी असल्यास मंहामंडळाकडे तक्रार करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज 25 सप्टेंबरपर्यंत महामंडळाकडे सादर करता येणार आहेत. त्यानंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.