HSC RESULT: पिंपरी चिंचवडचा बारावीचा निकाल 93.53 टक्के; मुलीच ठरल्या अव्वल

Pimpri Chinchwad's Class XII result is 93.53 percent; Girls topped the list;23 शाळांचा शंभर टक्के निकाल

एमपीसी न्यूज – इयत्ता बारावीचा निकाल आज (गुरुवारी) ऑनलाईन जाहीर झाला असून पिंपरी- चिंचवड शहराचा 93.53 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा साडेचार टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. या निकालात 96 टक्के मुलींनी बाजी मारली आहे. तर, 23 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जुलैमध्ये जाहीर झाला.

पिंपरी-चिंचवड शहरातून बारावीच्या परीक्षेसाठी 17 हजार 389 विद्यार्थांनी नोंदणी केली होती. नऊ हजार 428 मुले, तर 7 हजार 877, अशा एकूण 17 हजार 305 विद्यार्थांनी परीक्षा दिली.

त्यापैकी 8 हजार 624 मुले आणि 7हजार 562 मुली असे मिळून 16 हजार 186 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. यात 96 टक्के मुलींनी बाजी मारली.

या परीक्षेत चिंचवडमधील चिंतामणी रात्रप्रशालेने आघाडी घेत 90.47 टक्के मिळविले आहेत. गेल्यावर्षी 61.90 टक्के प्राप्त केले होते. यावर्षी 21 विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने फर्स्ट क्लास मिळविला असून 14 जणांनी 50 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.

या शाळांचा शंभर टक्के निकाल !

न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक ऍण्ड आबासाहेब चिंचवडे, बिजलीनगर, श्री फत्तेचंद जैन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, टेक्‍नॉलॉजी चिंचवड, जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पिंपरी, सौ. ताराबाई मुथा कन्या प्रशाला चिंचवड, आर्य विद्यामंदिर गर्ल्स कॉलेज, के. जे. गुप्ता ज्युनिअर कॉलेज, चिंचवडस्टेशन, श्रीमती संजुबेन अजमेरी हायस्कूल पिंपरी, सरस्वती इंग्लिश स्कुल पवार नगर कुदळवाडी, कै. नागनाथ मारुती गडसिंग ज्युनिअर कॉलेज, चिंचवड, हॉरीझॉन इंग्लिश मीडियम स्कूल दिघी, सरस्वती विश्‍वविद्यालय ज्युनिअर कॉलेज, निगडी, श्री फत्तेचंद जैन विद्यालय, चिंचवड, श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज भोसरी, लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेज जुनी सांगवी, क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल आकुर्डी, एसएनबीपी कॉलेज रहाटणी, सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय रावेत, केंब्रिज आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेज, चिंचवड, सी.एम.एस इंग्लिश मीडियम हायस्कूल निगडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.