HSC Result : पुणे विभागात 34 विषयांचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Result) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होत असलेल्या पुणे विभागात 137 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यातील 34 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

गुजराती, सिंधी, जापनीज, स्पॅनिश, चायनीज, पाली, टेक्सटाईल्स, डिजाईन अँड कलर, वोकल लाईट म्युजिक, वोकल क्लासिकल म्युसिक, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, स्कुटर अँड मोटरसायकल सर्व्हिस, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, ऑफिस मॅनेजमेंट, स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ इम्पॉवरमेन्ट, ऍनिमल सायन्स अँड डेअरी, फ्रेश वॉटर फिश कल्चर, मल्टी स्किल (इलेक्ट्रिकल), मल्टी स्किल (फूड प्रोसेसिंग), हेल्थकेअर जनरल ड्युटी, ब्युटी थेरपिस्ट, ऍग्रीकल्चर मायक्रो इर्रीगेशन टेक्नॉलॉजी, ट्रेड प्रॅक्टिकल, कॉम्पुटर टेक्नॉलॉजी एक, कॉम्पुटर टेक्नॉलॉजी दोन, कॉम्पुटर टेक्नॉलॉजी तीन, ऍनिमल हजबंडरी अँड डेअरी एक, ऍनिमल हजबंडरी अँड डेअरी दोन, ऍनिमल हजबंडरी अँड डेअरी तीन, फिशरीज टेक्नॉलॉजी दोन, चाईल्ड. ओल्डएज अँड हेल्थकेअर एक, चाईल्ड. ओल्डएज अँड हेल्थकेअर दोन, चाईल्ड. ओल्डएज अँड हेल्थकेअर तीन चाईल्ड. ओल्डएज अँड हेल्थकेअर या 34 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

तसेच तीन विषयांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा कमी लागला आहे. फिशरीज अँड टेक्नॉलॉजी (HSC Result) एक, फिशरीज अँड टेक्नॉलॉजी तीन या विषयांचा 85.71 टक्के निकाल लागला. सायकोलॉजी विषयाचा निकाल 89.05 टक्के लागला. उर्वरित 100 विषयांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे.

HSC Result : यंदा पुण्याने पटकवला दुसरा क्रमांक; पुणे विभागाचा निकाल 93.34 टक्के

पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक (93.69 टक्के) लागला आहे. अहमदनगर जिल्ह्याचा 92.63 टक्के तर पुणे जिल्ह्याचा सर्वात कमी 91.14 टक्के निकाल लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.