HSC Result : बारावीचा निकाल 99.66 टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात करण्यात आला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा 99.63 टक्के लागला आहे.

सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा 99.81 टक्के लागला आहे. हा निकाल इतर विभागापेक्षा सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा 99.34 टक्के लागला आहे.

बारावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 13 लाख 14 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.63 टक्के आहे

बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थीनींचा निकाल 99.73 टक्के लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल हा 99.54 टक्के लागला आहे. विद्यार्थींनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.19 टक्क्यांनी अधिक आहे.

निकालाची विभागवार टक्केवारी
१) कोकण : 99.81
२) मुंबई : 99.79
३) पुणे : 99.75
४) कोल्हापूर : 99.67
५) लातूर : 99.65
६) नागपूर : 99.62
७) नाशिक : 99.61
८) अमरावती : 99.37
९) औरंगाबाद : 99.34

कुठे पाहाल निकाल –
https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.