Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाला चांगला प्रतिसाद

500 हुन अधिक जणांना शिबिरात लाभ

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्वछता सेवा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती सेवा सप्ताहच्या संयोजिका राष्ट्रीय महिला मोर्चा, भाजप, राष्ट्रीय अध्यक्ष उषा बाजपेयी (एनजीओ आणि कारगिर राष्ट्रीय महिला मोर्चा संयोजिका) यांनी पत्रकाद्वारे दिली.

खडळकर वस्ती, (हडपसर रेल्वे स्टेशन जवळ) मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये डोळे, अस्थमा, रक्तदाब, मधुमेह या तपासण्याचा समावेश होता. या शिबिराचा 500 हुन अधिक जणांनी लाभ घेतला.

‘चेस्ट रिसर्च फाउंडेशन’ आणि ‘सिप्ला कंपनी’च्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले होते. मुकुंद वर्मा, वर्षा दहाडे, डॉ.नीरज सिंग, डॉ. गोविंद नरके, डॉ.नितीन वंजारा यांच्यासह 20 डॉक्टर्स आणि 17 सहडॉक्टर्स यांनी रुग्णांची तपासणी केली.

उषा बाजपेयी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वछता ही सेवा या उपक्रमात प्लस्टिक मुक्ती, स्वच्छता अभियान, स्वस्थ भारत अभियान, जलसंधारण आणि संवर्धन या संकल्पाबाबत जनजागरण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.