Maval : रवींद्र भेगडे यांच्या संघर्षयात्रेस आंदर मावळात प्रचंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभेतून भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार रवींद्र (आप्पा) भेगडे यांनी मावळ तालुक्यातील ग्रामस्थांच्या भेटीस काल (दि १३ सप्टेंबर) आंदर मावळ भागातून संघर्ष यात्रेस सुरुवात केली. आंदर मावळातील संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याला ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

तरुणांसाठी रोजगार, नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य, तसेच मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास या मुद्यांना लक्षात घेऊन ही संघर्ष यात्रा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये पोहोचणार आहे. पक्षाशी निष्ठावंत व स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून रवींद्र भेगडे यांच्या नावाला सर्वांकडून पाठिंबा मिळत आहे.

संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रवींद्र भेगडे ही विधानसभा निवडणूक लढविणारच हा स्पष्ट संदेश मावळ तालुक्यातील जनतेपर्यंत पोहचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.