Pune : प्राधिकरणात चाबुकस्वार यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज – प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभेचे शिवसेना उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या पदयात्रेने प्राधिकरण परिसर आज टिपून गेला.

महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ आज प्राधिकरणात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक प्रमोद कुटे, अमित गावडे, राजेश फलके, अमोल निकम, पिंपरी विधानसभा संयोजक राजू दुर्गे, नारायण बहिरवाडे, आदींसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

म्हाळसाकांत चौकापासून पदयात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर सेक्टर २६, २७ व २८ या भागातून पदयात्रा काढून हा परिसर शिवसेनामय करून टाकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.