BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महाजनादेश यात्रेमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सायंकाळी पाच वाजता पुण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 270 किलोचा हार घालून भव्य स्वागत करण्यात आले. मात्र या यात्रेमुळे पुणे शहरातील शिवाजीनगर ते हडपसर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नागरिक तब्बल गेल्या तीन तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

या यात्रेसाठी शिवाजीनगर परिसरात हॉटेल प्राईड जवळ मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मांडव घालण्यात आले होते. या मांडवांमुळे शिवाजीनगर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संताप व्यक्त केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.