Sangvi Crime News : पिंपळे निलख येथील हुक्का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथील एका हॉटेलच्या टेरेसवर सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 17) रात्री करण्यात आली.

हॉटेल चालक आशिष शिवाजी शेळके (वय 31, रा. निगडी), मॅनेजर बबलू आब्दुल हुसेन अहमद (वय 23, रा. पिंपळे निलख), वेटर इंजारूल बाबू शेख (वय 24), वेटर रोहूल वाहेद शेख (वय 20) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपळे निलख येथील अझारो रेस्टो बार लॉन्स या हॉटेलच्या टेरेसवर प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पिण्याचे फ्लेवर, हुक्का पिण्यासाठी लागणारे इतर साहित्य विक्रीसाठी ठेवले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

दरम्यान, हॉटेल मालक, मॅनेजर आणि दोन वेटर अशा चौघांना अटक करून 38 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.