BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मुंबई-बेंगलोर हायवेवर नवीन विभाजक बसविण्यात येण्याची ह्युमन राईटसची मागणी

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मुंबई बेंगलोर हायवे येथील डीवायडरची तोडफोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरी तेथे नवीन विभाजक त्वरीत बसविण्यात यावा, अशी मागणी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे रामराव नवघन यांनी रोडवेज कार्यालयातील शाखाधिकारी यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  मुंबई बेंगलोर हायवे येथील विभाजकाची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे. त्याठिकाणी छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. येथील रहदारीस शिस्त लागावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता या भागामध्ये नवीन रस्ता विभाजक बसवावेत. वाहतुकीला शिस्त लागावी, कोंडी कमी व्हावी, वाहतूक सुरळीत व्हावी, चौकांचे सुशोभीकरण व्हावे म्हणून मुंबई-बेंगलोर हायवे वर विभाजक बसविण्यात यावेत.

HB_POST_END_FTR-A1
.