Pune News : पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना आढळली मानवी कवटी

एमपीसी न्यूज : गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना मानवी कवटी आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिरूर जिल्ह्यातील सणसवाडी गावातून हा प्रकार उघडकीस आलाय. खोदकाम सुरू असताना मानवी कवटी सहित हाताची हाडे आणि हाडांचा चुरा आढळून आलाय. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे-नगर महामार्गावरील सणसवाडी येथे खाजगी गॅसची पाईप लाईन टाकण्यासाठी जेसीबी द्वारे खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाला अचानक मानवी कवटी दिसली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोदकाम केले असता मानवी कवटी सहित हाताचे हाडे आणि हाडांचा चुरा सापडला.

पोलिसांनी ही मानवी कवटी आणि हाडाचे तुकडे ताब्यात घेत तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवून दिले आहेत. मात्र सापडलेले हे मानवी अवशेष कोणाचे, यामागे काही घातपात आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.