Sangvi : लग्नाचे आमिष दाखवून भावी जावयाने सासरच्यांना घातला लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज – घटस्फोटीत महिलेशी विवाह करण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तिच्या घरच्यांशी संपर्क वाढवला. महिलेच्या घरच्यांनी देखील त्याला भावी जावई म्हणून स्वीकारले. तसेच त्याचा मानपान केला. याचा गैरफायदा घेत भावी जावई महिलेचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि कागदपत्रे घेऊन पसार झाला. ही घटना ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.

सुशीला पॅंन्ट्रीक डिसोझा (वय 53, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मधुकुमार भास्करन (रा. कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकुमार याने सुशीला यांच्या मुलीसोबत शादी डॉट कॉम या ऑनलाईन विवाह संस्थेच्या संकेतस्थळावरून ओळख बनवली. सुशीला यांच्या मुलीचा घटस्फोट झाला होता. हे माहिती असून मधुकुमार तिच्याशी लग्न करणार होता. यामुळे सुशीला यांच्या कुटुंबीयांनी देखील मधुकुमार याला भावी जावई म्हणून स्वीकारले होते. यातूनच मधुकुमार याने सुशीला यांचा आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचा विश्वास संपादन केला.

दरम्यान, सुशीला यांच्या मुलीच्या डोक्यात जखम झाली. ही जखम नीट करण्याच्या बहाण्याने मधुकुमार याने तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊन घरातून पोबारा केला. लग्नाच्या बहाण्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुशीला यांनी सांगवी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.