BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून हजारोंचा ऐवज लंपास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून शोरूम मधून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली. प्रदीप जगन्नाथ जाधव (वय 27, रा चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप यांचे पिंपळे सौदागरमध्ये गोविंद गार्डन चौक जवळ आयडिया कंपनीचे शोरूम आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास त्या शोरूम कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. शोरूममधून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 22 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.