Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती व सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची फिर्याद विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मे ते 3 नोव्हेंबर या कालावधीत भूमकर चौक वाकड येथे घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सिद्धांत श्रीमंतराव मस्के, मंगल श्रीमंतराव म्हस्के (दोघे रा. भुमकर चौक, वाकड), अशी गुन्हा दाखल झालेल्या पती आणि सासूचे नाव असून याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती सिद्धांत आणि फिर्यादी महिलेचा 12 मे 2019 रोजी विवाह झाला. विवाहानंतर घरात लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली. माहेरच्यांनी दिलेले 25 तोळे सोन्याचे दागिने व कार सासरच्यांनी स्वतःकडे ठेवली. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी महिला व त्यांच्या मित्राचे झालेले संभाषण विवाहितेच्या भावाला पाठवून बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.