Chakan : घरासमोर मुरूम टाकण्यावरून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – शेजारच्या घरासमोर मुरूम टाकल्यामुळे घरासमोर पाणी साचले. याबाबत विचारणा करणा-या पती-पत्नीला तिघांनी मारहाण केली. ही घटना 24 जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास खेड तालुक्यातील रासे येथे घडली.

सोमनाथ महादेव मुंगसे (वय 41, रा. रासे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ओंकार दत्तात्रय मुंगसे, आदिनाथ दत्तात्रय मुंगसे, मंगल दत्तात्रय मुंगसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि आरोपी यांचे घर एकमेकांच्या शेजारी आहे. आरोपींनी त्यांच्या घरासमोर मुरूम टाकल्यामुळे सोमनाथ यांच्या घरासमोर पाणी साचून चिखल होत होता. त्यामुळे सोमनाथ आणि त्यांच्या पत्नीने याबाबत आरोपींकडे विचारणा केली. यावरून ओंकार याने खो-याच्या दांड्याने सोमनाथ यांना मारले. आदिनाथ याने लाकडी दांडक्याने सोमनाथ यांच्या पत्नीच्या हातावर मारले. मंगलने सोमनाथ यांच्या पत्नीला खाली पाडून हाताने मारहाण केली. या भांडणात सोमनाथ आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.