Pune News : पत्नीसोबत फिरताना दिसल्याने पतीकडून तरुणाची धुलाई

एमपीसी न्यूज : पत्नीसोबत फिरणाऱ्या एका तरुणाची पती आणि त्याच्या मित्रांनी चांगलीच धुलाई केली. 6 फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडीतील चव्हाण चाळीजवळ हा प्रकार घडला.

याप्रकरणी  28 वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण करणाऱ्या पतीला अटक करण्यात आली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे मैत्रिणीसोबत विश्रांतवाडी परिसरातून जात होते. यावेळी मैत्रिणीच्या नवऱ्याने या दोघांना एकत्र पाहिले. त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने दोघांनाही रस्त्यात थांबवले. ‘माझ्या बायकोबरोबर का फिरतोस’ अशी विचारणा करीत पट्ट्याने बेदम मारहाण केली.

दरम्यान तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एकाला अटकही केली आहे. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.