Pimpri: मुलाला मोबाईलमधील नाव वाचता न आल्याने वडिलांची मुलासह पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – मुलाला मोबाईलमधील नाव वाचता न आल्याने वडिलांनी त्याला हाताने मारहाण केली. मुलाला मारु नका असे सागणा-या पत्नीला देखील अश्लील शिवीगाळ करत तिच्या डोक्यात हिटरचा रॉड घातला. ही घटना गुरूवारी (दि.15) सकाळी साडेदहा वाजता पिंपरी, संत तुकारामनगर येथे घडली.

याप्रकरणी शितल विलास जाधव (वय-30, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास रंगनाथ जाधव (वय-38) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पती-पत्नी आहेत. आरोपीने मुलास मोबाईलमधील नाव वाचण्यास सांगितले. मुलाला नाव वाचण्यास न आल्याने आरोपीने त्याला हाताने मारहाण केली. मारहाण करू नका, असे सांगणा-या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत हिटरचा रॉड तिच्या डोक्यात मारला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.