Hinjawadi : विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पतीने केलेल्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. ही घटना 21 जानेवारी रोजी बावधन येथे घडली. याप्रकरणी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

विनोद माणिकराव माने (वय 47, रा. सत्यमेव सोसायटी, बावधन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत त्याचे सासरे (वय 78) यांनी शनिवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 पासून आरोपी विनोद माने याने फिर्यादी यांची मुलगी (वय 39) हिला वेळोवेळी शाररीक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने 21 जानेवारी 2020 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक आर. आर. दिवटे तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like